S M L

विधानसभेत मनसे फॅक्टर महत्त्वाचा

18 मे, विनोद तळेकर 15 व्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर राज्यात आता मनसे फॅक्टरला दुर्लक्षित करता येणार नाही हे स्पष्ट झालं आहे. मनसेने मिळवलेल्या मतांची आकडेवारी पाहता विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या प्रस्थापित पक्षांना आपली रणनिती आखावी लागणार आहे. मनसेचे एकमेव स्टार कॅम्पेनर राज ठाकरेप्रचाराची धुरा एकहाती खांद्यावर घेत लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. मनसेचा 12 पैकी एकही उमेदवार निवडून आला नाही पण राज्यात सत्तेची समीकरणं बदलवायला मनसे कारणीभूत ठरला. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा मराठी मतांचं विभाजन करणार नाही ना, याची चिंता शिवसेनेला लागली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेचच संध्याकाळी सेनाभवनात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक बोलावली. यात मनसेचा वारू विधानसभेत कसा रोखता येईल यावर चर्चा झाली. त्याअगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी मनसेमुळे फटका बसल्याचं मान्य केलं नाही. पण मनसेची वाढलेली ताकद सगळ्याच प्रस्थापित पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनिती आखताना प्रत्येक पक्षाला मनसे फॅक्टरचा विचार करावा लागणार आहे. सध्या जरी मनसेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयाला हातभार लागला असला तरीही विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बसू शकतो. भाजपच्या उमेदवारांना तर तो याच निवडणुकीत बसलाय. मुंबईतल्या निकालानुसार उत्तर पूर्व, दक्षिण आणि उत्तर मुंबईतल्या जवळपास 17 विधानसभा मतदारसंघात मनसेला अनुकूल वातावरण असल्याचं त्यांना मिळलेल्या मतांवरून स्पष्ट झालंय. त्यामुळे या 12 उमेदवारांव्यतिरिक्त मनसेचे उमेदवार उभे नसलेल्या महाराष्ट्रातल्या उरलेल्या 36 मतदारसंघात मनसेच्या या निकालांचा पॉझिटीव्ह इफेक्ट होऊ शकतो आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभेत होऊ शकतो असं चित्र दिसून येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 12:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close