S M L

देवदूत मच्छीमाराने वाचले 'त्या' तिघांचे प्राण

Sachin Salve | Updated On: Sep 9, 2014 08:53 PM IST

देवदूत मच्छीमाराने वाचले 'त्या' तिघांचे प्राण

nivati09 सप्टेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती दीपगृहावर गेल्या आठवड्याभरापासून अडकलेल्या 3 कर्मचार्‍यांची आज अखेर सुटका झाली. श्रीधर मेहतर या धाडसी मच्छीमाराने जीवाची बाजी लावून त्या तिघांची सुटका केली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारे हा प्रकार घडलाय.

गेल्या तीन दिवसांपासून अन्न पाण्याविना निवती दीपगृहावर अडकलेल्या 3 कर्मचार्‍यांची सुटका झाली खरी पण सरकार किंवा प्रशासन कोणालाही या कर्मचार्‍यांच्या जीवाची पर्वा नव्हती.

हे तिघेजण समुद्रात 22 किलोमीटरवर असलेल्या निवती रॉकवरच्या लाईटहाऊसवर अडकले होतं. या कर्मचार्‍यांची इथे 3 महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती. त्यांना अन्न-पाणी पुरवण्याचं काम एका ठेकेदाराला दिलं होतं.

मात्र ठेका संपल्यानं बोटीचा ठेकेदार बोट न्यायला तयार होत नव्हता. कर्मचार्‍यांकडचं अन्न-पाणी संपत आलं होतं. उपासमार होऊ लागल्यानं कर्मचार्‍यांनी लाईट हाऊस ऍन्ड शिपिंग विभागाला सुटकेसाठी वारंवार विनंती केली. पण याकडे विभागाने लक्षही दिलं नाही. शेवटी आज या धाडसी मच्छीमाराने जीवावर उदार होऊन समुद्रात अडकलेल्या तीन कर्मचार्‍यांची सुटका केली. त्यामुळे या मच्छिमाराचं कौतुक होतंय, तर लाईट हाऊस ऍन्ड शिपिंग विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2014 08:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close