S M L

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड

Samruddha Bhambure | Updated On: Sep 10, 2014 01:32 PM IST

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड

10 सप्टेंबर :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या पाठोपाठ शिवसेनेने ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरे यांची निवड झाली आहे तर उपमहापौरपदी शिवसेनेचेच राजेंद्र साप्ते विजयी झाले आहेत.

संजय मोरे यांना एकूण 66 मते पडली तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना 46 मते पडली. तर उपमहापौर राजेंद्र साप्ते यांना 66 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या मेघना हंडोरे यांना 49 मतं मिळाली आहेत.

संजय मोरे हे वागळे इस्टेट परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे रवींद्र फाटक गटाचे चार नगरसेवक पक्षाचा व्हिप जुगारुन मतदानाला अनुपस्थित राहिले तर काँग्रेसच्या एका नगरसेविकेने शिवसेनेच्या बाजूने मतदान केलं, त्यामुळे त्यांचं नगरसेवकपद धोक्यात आलंय. वागळे इस्टेट परिसरातून तीन वेळा निवडून आलेले मोरे हे आमदार एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2014 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close