S M L

कांद्याच्या निर्यातबंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Samruddha Bhambure | Updated On: Sep 10, 2014 01:44 PM IST

कांद्याच्या निर्यातबंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

10 सप्टेंबर : कांद्याच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्याची निर्यात खुली केली नाही तर महायुतीतून बाहेर पडायलाही मागेपुढे बघणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिला आहे.

कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलनही केलं. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलन करताना शेतकरी संघटना महायुतीच्या विरोधात भूमिका घेताना दिसते आहे. या आंदोलनादरम्यान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. विशेष म्हणजे केंद्रात एनडीएचं सरकार आहे, त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी आहे. कांद्याचं निर्यातमूल्य हटवा अन्यथा येणार्‍या निवडणुकीत चांगले परिणाम होणार नाहीत, असा इशारा यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2014 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close