S M L

'मराठी माणसाचा दुश्मन तो माझा दुश्मन' : बाळासाहेबांनी राजवर डागली तोफ

19 मे, लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे मुंबई पट्टयात शिवसेनेला पराभवला सामोर जावं लागलं. त्यामुळे काका आणि पुतण्यातील वाद आता ऊफाळून आलाय. सेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून बाळासाहेबांनी राज ठाकरेंशी असलेलं नातं तुटल तरी चालेल, अशी कठोर भूमिका घेतल्याचं समजतंय. राज ठाकरे मराठीचा दुश्मन आहे, अशी प्रखर टीकाही खुद्द हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रथमच केलीय.लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेमुळे मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेला पराभवाला सामोर मुंबईतील लालबाग, परळ, शिवडी भागातील मराठी मतांमध्ये मनसेमुळे फुट पडली त्याचा परिणाम म्हणजे काँग्रेसचा विजय सुकर झाला. ठाण्याच्या परंपरागत गडही मनसेमुळे ढासळला. त्यामुळे सेनेच्या पायाखालीची जमिन सरकलीय . त्यातंच शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी राज आणि उध्दव यांना एकत्र आणण्याची भाषा सुरू केली . राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे फोनवरून संपर्क साधातात असं जाहीर व्यक्तव्य त्यांनी केलं. आणि सेनेत वादळ उठलं. उध्दव ठाकरेंनी जोशीसरांच्या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त करताच लागलीच जोशी सरांना माघार घेत सारवासारव करावी लागली. शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या व्यत्कव्यामुळे मराठी माणसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अखेर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडली आहे. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर तोफ डागली. मराठीच्या मुद्द्यावरून काका पुतण्यातील नातेसंबंध पुन्हा एकदा ताणले गेल्याचं समजतंय. या प्रकरणामुळे दैनिक सामनातून बाळासाहेबांनी राज ठाकरेंचा खरपुस समाचार घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 'शिवसेना आणि मराठी माणसांच्या मुळावर येणार्‍यांशी संपर्क का म्हणून ठेवायचा ?... ही असली ढोंग मी उभ्या आयुष्यात केली नाहीत. चांगले संबंध होते तोपर्यंत राज माझ्या संपर्कात होता. आता ते शक्य नाही. शिवसेनेची स्थापना मी मराठी माणसांच्या भक्कम एकजूटीसाठी केली. ही एकजूट फोडून राजकारण करणार्‍या रक्ताच्या नात्याची मी पर्वा करीत नाही. माझी बांधिलकी माझे कडवट शिवसैनिक आणि आतापर्यंत साथ देणार्‍या मराठी बांधवाशी आहे', अशी परखड वक्तव्यं बाळासाहेबांनी राज ठाकरे यांच्यांवर केली आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेत चिंतेच वातावरण आहे. त्यातच मराठीच्या मुद्द्यावरून लढणार्‍या शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षात निर्माण झालेल्या या तेढीमुळे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला रोखण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना काका पुतण्याचं नातंच संपवण्याची भाषा करावी लागतेय. मात्र सर्वसामान्य मराठी माणूस शिवसेनेच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद देतो, ते विधानसभा निवडणुकीतील निकालानंतरचं कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2009 07:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2009 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close