S M L

प्रभाकरनचा मृतदेह सापडला

19 मे, लिट्टेप्रमुख व्ही. प्रभाकरनचा मृतदेह श्रीलंकेतल्या नान्तिकडल इथे सापडला आहे. लिट्टेच्या युनिफॉर्ममध्ये हा मृतदेह आढळला आहे. प्रभाकरनला ठार मारलं गेल्याचं उघडकीस आलं असून त्याच्या डोक्यात गोळ्या घुसल्याचं स्पष्ट झालंय. प्रभाकरन कालच मारला गेल्याची पुष्टी श्रीलंकन सरकारनं दिली होती. पण त्यावर मात्र आज तो जिवंत असल्याचा दावा लिट्टेनं केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान लिट्टेप्रमुख व्ही. प्रभाकरनचा मृतदेह श्रीलंकेतल्या नान्तिकडल इथं सापडल्याने या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळालाय. लिट्टेच्या युनिफॉर्ममध्ये त्याचा हा मृतदेह सापडलाय. तसंच प्रभाकरनच्या डोक्यात गोळ्या घुसल्याचंही स्पष्ट झालंय. प्रभाकरनचा मृतदेह सापडल्यानंतर श्रीलंकन लष्कराने जोरदार जल्लोष साजरा केला. श्रीलंकेतल्या दहशतवादाचा एक अध्याय प्रभाकरनच्या मृत्यूमुळं संपलाय. गेली 30 वर्षं श्रीलंकन सरकारकडे तामिळी जनतेच्या मानवी हक्कांसाठी लढणार्‍या लिट्टेप्रमुख प्रभाकरनचा संघर्ष आता संपला आहे. त्यामुळे त्याची लिट्टे ही संघटना संपुष्टात आली आहे. अखेर वेलुपिल्लाई प्रभाकरन हे गेली 30 वर्षं श्रीलंकेत घोंघावत असलेलं वादळ अखेर शांत झालं आहे. प्रभाकरनचा जन्म 26 नोव्हेंबर 1954 रोजी जाफनामधल्या किनारी भागातल्या वेल्वित्तीथुराई शहरात झाला. चार भांवडांत वेलुपिल्लाई प्रभाकरन सर्वात छोटा...सातव्या इयत्तेनंतर त्यानं शाळा सोडली. शाळेत तो एक सर्वसामान्य बुद्धीचा आणि लाजाळू मुलगा होता. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग हे प्रभाकरनचे आदर्श होते.प्रभाकरनने 1972 मध्ये तामिळ न्यू टायगर्स नावाची संघटना स्थापन केली. 1975 मध्ये त्यानं पहिला राजकीय खून केला, जाफनाच्या महापौरांचा 5 मे 1976 मध्ये तामिळ न्यू टायगर्सचं नाव बदलून लिट्टे म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम असं करण्यात आलं. 1983 मध्ये त्याने 13 सैनिकांची हत्या करत श्रीलंकेविरोधात गरिला वॉर सुरू केलं. त्यानं एक शिस्तबद्ध सशस्त्र लढा सुरू केला. 1984 मध्ये तेव्हाच्या मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईमध्ये त्याने माथिवथानी इराम्बू हिच्याशी लग्न केल्याचा दावा केला जातो. 1987 मध्ये भारतानं श्रीलंकेत शांतीसेना पाठवली. लिट्टेविरुद्धच्या संघर्षात एक हजार भारतीय सैनिकांचा बळी गेला. 1990 मध्ये भारतानं लष्कर परत बोलावलं. 1991 मध्ये लिट्टेच्या सुसाईड बॉम्बरनं राजीव गांधींची तामिळनाडूतल्या पेरांबदूरमध्ये हत्या केली. याच वर्षी लिट्टेनं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष प्रेमदास यांना ठार मारलं. 1995 मध्ये श्रीलंकेच्या अध्यक्षा चंदि्रका कुमारतुंगे यांनी लिट्टेविरोधात कठोर पावलं उचलली. 2002 मध्ये नॉर्वेच्या मध्यस्थीनंतर लिट्टे आणि श्रीलंका सरकामध्ये शस्त्रसंधी झाली.2003 मध्ये लिट्टेनं शांतता चर्चा रद्द करत शस्त्रसंधी मागं घेतली. 2005 मध्ये श्रीलंकेच्या अध्यक्षपदी महिंदा राजपक्षे निवडून आले. तर 2006 मध्ये जिनिव्हामधली शांतता चर्चा पुन्हा अयशस्वी झाली. 2007 मध्ये श्रीलंका सरकारनं लिट्टेच्या पूर्वेकडचा महत्त्वाचा भाग ताब्यात घेतला.2008 च्या जानेवारीत श्रीलंका सरकारनं लिट्टेविरोधात जोरदार मोहीम उघडली. जानेवारी 2009 मध्ये श्रीलंका लष्करानं किलोनोच्ची ही लिट्टेची राजधानी ताब्यात घेतली. एप्रिल 2009 मध्ये लिट्टेनं केलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव श्रीलंकेनं धुडकावला. श्रीलंकन लष्कराने लिट्टेला शरण येण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. त्याने माघार घेतली नाही. त्याचा लढा आजन्म सुरूच होता. त्याचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकन लष्कराने अखेरीस त्याचा खात्मा केला. प्रभाकरनचा अंत झाल्यामुळे श्रीलंकेमधल्या दहशतवाद्याचाच शेवट झाल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2009 10:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2009 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close