S M L

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, 60 उमेदवारांची यादी तयार ?

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2014 06:23 PM IST

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, 60 उमेदवारांची यादी तयार ?

13 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून पक्षांची लगबग आता सुरू झाली आहे. सत्तेचा दावा करणार्‍या महायुतीने अखेर पहिल्या 60 उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र 6 आमदारांची नावे पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याचं कळतंय.

मुंबईत दादरमध्ये वसंतस्मृती इथं भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीचा आणि जागावाटपाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला. त्याअगोदर शुक्रवारी रात्री भाजपच्या नेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. जागावाटपाचा फॉर्म्युला आणि मित्रपक्षांना देण्यात आलेल्या जागांपेक्षा जास्त जागा देण्यावर चर्चा झाली. आज पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत उर्वरीत 60 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. नाव तयार करण्यात आली असून सर्व नाव दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. यात सहा जे आमदार आहे ज्यांनी लोकसभेत पक्षाच्या विरोधात काम केलं अशा आमदारांची नावं बाजूला ठेवण्यात आलीये. या आमदारांना समज देऊन त्यांची नावं पुढच्या यादीत समाविष्ट केली जाणार असल्याचं कळतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2014 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close