S M L

पंकजा मुंडे CM व्हाव्यात आणि गृहमंत्रीपद मी घेणार -तावडे

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2014 04:30 PM IST

पंकजा मुंडे CM व्हाव्यात आणि गृहमंत्रीपद मी घेणार -तावडे

vinod tawade on pankaja13 सप्टेंबर : मी, संघर्षयात्रा अनुभवतोय पंकजा मुंडे यांच्यासाठी जी गर्दी होत आहे ती पाहून खात्री आहे की, पंकजा मुंडे याच पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील असं जाहीर वक्तव्य भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केलंय.

तसंच सत्तेवर आल्यास गृहमंत्रीपद मीच घेणार आणि अजित पवारांचा हिशेब चुकता करणार असा दावाही तावडेंनी केला. ते चाळीसगावमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रोज नवी नावं ऐकायला मिळत आहे. आमदार पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चाही होतेय. त्यातच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडेंमध्ये राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य केलंय.

पंकजा मुंडेंची संघर्ष यात्रा शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात होती. चाळीसगावमध्ये झालेल्या सभेत विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा बोलून दाखवली. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी मी अनुभवली आहे. ही गर्दीच सांगते की, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री पंकजा मुंडे याच होतील असं तावडे म्हणाले. तसंच सत्तेत आल्यावर गृहमंत्रीपद मीच घेणार आणि अजित पवारांचा हिशेब चुकता करणार अशी गर्जनाही तावडेंनी केली. मात्र आपण मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार नसल्याचं पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2014 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close