S M L

'बाबा' अकार्यक्षम तर 'आबा' नुसते बडबडे, गडकरींचे टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2014 10:20 PM IST

'बाबा' अकार्यक्षम तर 'आबा' नुसते बडबडे, गडकरींचे टीकास्त्र

13 सप्टेंबर : मुख्यमंत्री हे काही कामाचे नाही, पश्चिम महाराष्ट्राचे असूनही काहीच काम केलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातले अकार्यक्षम आणि महाराष्ट्राला मागे पाडणारा असा मुख्यमंत्री म्हणून बाबांना सुवर्णपदकही देता येणार नाही असा इतिहास त्यांनी केलाय अशी खरमरीत टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये गृहमंत्री आर.आर.पाटील यांना शह देण्यासाठी भाजपची जंगी सभा झाली. यावेळी त्यांनी आघाडी सरकार, काँग्रेस, गृहमंत्र्यांवर सडकून टीका केली.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजपची पहिलीच प्रचार सभा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पार पडली. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांनी गडकरींच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आर आर पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. महाराष्ट्राच्या इतिहासातले अकार्यक्षम मुख्यमंत्री असून ते काही कामाचे नाही, पश्चिम महाराष्ट्राचे असूनही काहीच काम केलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातले अकार्यक्षम आणि महाराष्ट्राला मागे पाडणारा असा मुख्यमंत्री म्हणून बाबांना सुवर्णपदकही देता येणार नाही असा इतिहास त्यांनी केलाय अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.

पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याची वेळ आली होती तेव्हा पंतप्रधानांनी मला लक्ष घालायचं सांगितलं. पण माझ्या हातून चूक घडली, मी साहित्यिक, कलाकार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शोधली पण बडबड करणारे वाचाळ अशा लोकांसाठी मात्र कॅटेगरीच नव्हती. त्यामुळे अशा वाचळखोर लोकांना जर पद्म पुरस्कार देण्याच ठरलं तर तुमच्याच भागातील वाचाळखोर नेत्याला पद्म पुरस्कार द्यावा लागेल असा मिश्किल टोला गडकरींनी आर.आर.पाटील यांचं नाव न घेता लगावला.

तसंच भाजप जातीयवादी नसून काँग्रेस हाच जातीयवादी पक्ष असल्याचं सांगत घराणेशाहीवरही त्यांनी हल्लाबोल केला.' सोनिया आयी हे नई रोशणी लाई है' आता कुठे आहे ? सगळं जमा झालंय. बेरोजगारांच्या हाताला ना नोकर्‍या दिल्या न सर्वसामान्यांच्या फायद्याचं काही केलं त्यामुळे 'आता कसं वाटतं' असा टोलाही गडकरींनी लगावला. या सभेला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2014 09:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close