S M L

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 17 सप्टेंबरला जाहीर होणार - राणे

Samruddha Bhambure | Updated On: Sep 14, 2014 08:31 PM IST

7878narayan_rane

14 सप्टेंबर :  राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर रविवारी काँग्रेसची पहिली यादी 17 सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं आहे. काँग्रेसच्या विधानसभा प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. याशिवाय नारायण राणेंनी स्वत: कुडाळ मतदारसंघातून तर नितेश राणे कणकवली मतदारसंघातून लढणार असून त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुडाळ मतदारसंघात राणेंच्या विरुद्ध वैभव नाईक असा सामना होण्याची शक्यता आहे तर कणकवलीत नितेश राणे विरुद्ध भाजपचे प्रमोद जठार अशी लढत पाहायला मिळू शकते.

दरम्यान, यावेळेस नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2014 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close