S M L

दक्षिण कराड तर माझा गृह मतदारसंघ -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2014 02:31 PM IST

दक्षिण कराड तर माझा गृह मतदारसंघ -मुख्यमंत्री

cm on karad news15 सप्टेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुठून निवडणूक लढवणार यावरुन सस्पेन्स आता दूर होण्याची चिन्ह आहे. आता खुद्ध मुख्यमंत्र्यांनी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

निवडणुका माझाच नेतृत्वाखाली लढल्या जाणार हे आधीच निश्चित झालंय. आता कराड हा गृह मतदार संघ आहे, त्यामुळे दुसरीकडे कोठेही सेफ जागा शोधायला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

त्याच बरोबर जागावाटपात कमी अधिक होईल असंही सांगितलं आहे. त्याच बरोबर एकत्र लढताना अडचणी आहेत हे त्यांनी मान्य केले.

पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेस हायकमांडकडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी दक्षिण कराड या मतदारसंघाची निवड केलीये, पण हा मतदारसंघ सोडवून घेताना मुख्यमंत्र्यांना मोठा संघर्ष करावा लागणार अशी शक्यता होती.

रविवारी नवी मुंबईमध्ये माथाडी भवनमधल्या मेळाव्यात बोलताना दक्षिण कराडचे विद्यामान आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांनी कुठल्याही परिस्थितीत आपणच दक्षिण कराडमधून लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता खुद्ध मुख्यमंत्र्यांनीच यावरचा सस्पेन्स दूर केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close