S M L

मराठवाड्यात राज घेणार उमेदवारांच्या मुलाखती

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2014 03:11 PM IST

rajthakare_dombivali_15 सप्टेंबर : निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मनसेच्या संभाव्य उमेदवारीच्या चाचपणीला सुरूवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी 8 वाजल्यापासून मराठवाड्याच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील 46 जागांसाठी येणार्‍या इच्छुकांना आपापल्या मतदारसंघाचा गृहपाठ करून येण्याचा आदेशही देण्यात आलाय.

मराठवाड्यात हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने मनसेला एक आमदार मिळाला होता. मात्र आता जाधव सेनेत गेले आहेत. मराठवाड्यातील शहरी भाग आणि मराठवाड्यात मनसेच्या शाखा मोठ्या प्रमाणात आहे.

आता मराठवाड्यात किती उमेदवार देणार हे राज ठाकरे स्वत:च जाहीर करणार आहेत. तर राज ठाकरे यांचा मुलगा अमित हा सुद्धा मराठवाड्यातल्या या मुलाखतींना उपस्थित राहणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close