S M L

मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज यांची प्रकृती बिघडली

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2014 07:09 PM IST

346 raj 436534615 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जातीने लक्ष घालत आहे. मात्र आज (सोमवारी) मराठवाड्याच्या दौर्‍यावर असताना राज ठाकरे यांना ताप आल्याने त्यांनी मराठवाड्यातल्या इच्छुकांच्या मुलाखती अर्ध्यावर सोडल्यात. त्यानंतर उरलेल्या मुलाखती बाळा नांदगांवकर आणि प्रवीण दरेकर यांनी घेतल्यात.

गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांच्या मुलाखतीसाठी राज ठाकरे मराठवाड्यात हजर आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी मुलाखती घेतल्या मात्र दोन वाजता त्यांना पुन्हा मुलाखती घेत असतांना अचानक ताप आला. त्यानंतर ते हॉटेलमध्ये निघून गेले.

राज ठाकरे यांना काल पासूनच ताप आहे. त्यामुळे ते जरी गैरहजर असले ती कार्यकर्त्यांनी काळजी कऱण्याचं कारण नसल्याचंही बाळा नांदगांवकर यांनी सांगितलं.

मराठवाड्याच्या मुलाखतींची वेळ ठरली असल्याने ते मुलाखती घेण्यासाठी आले अशी माहितीही मनसे नांदगावकर यांनी दिली. पण, 2 वाजता त्यांना पुन्हा ताप आल्याने ते हॉटेलमध्ये निघून गेले. दरम्यान, औरंगाबाद विभागातल्या 7 जिल्ह्यातल्या मनसेच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close