S M L

देवा तुझी दुनिया न्यारी, माणसं भांडताय मुकी जनावर भक्त झाली !

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2014 10:29 PM IST

देवा तुझी दुनिया न्यारी, माणसं भांडताय मुकी जनावर भक्त झाली !

15 सप्टेंबर : एकीकडे साईबाबा देव आहेत की नाही यावरून वाद पेटलाय. मात्र साईबाबांच्या दर्शनासाठी गाभार्‍यात सध्या एक वेगळाच भक्त हजेरी लावतोय. हा भक्त म्हणजे एक वानर..गेल्या 15 दिवसांत या माकडाने साईमंदिरात दोनदा हजेरी लावली आहे. एकीकडे साईबाबांवरुन वाद सुरू आहे मात्र या मुक्या जनावराच्या भक्तीमुळे सर्वच जण निशब्द झाले आहे.

शिर्डी साईमंदिरात गेल्या पंधरा दिवसांत दोनदा वानर राजानी हजेरी लावलीय. 25 तारखेला हे वानर, दर्शन रांगेतून थेट समाधीजवळ आलं आणि बाबांना वाहीलेली फुलं त्याने खाल्ली. मंदिरात त्यावेळी गर्दी असताना कोणत्याही भक्ताला या वानराने त्रास दिला नाही. रविवारी पुन्हा हे वानर साईबाबांच्या समाधीजवळ येऊन बसले. ह्या सर्व प्रकाराला वानराची भक्ती म्हणायची की सुरक्षारक्षक यांचा हलगर्जीपणा.जर त्याने कुणावर हल्ला केला असता तर त्यास जबाबदार कोण हा प्रश्न आहे. साईबाबांच्या मंदिरात तसही दररोज गावातील अनेक कुत्रे भक्तांच्या दर्शन रांगेतून जातात आणि कुणालाही काही इजा न करता समाधीजवळ जाऊन बाहेर पडतात. यात आता या वानराची भर पडली आहे. मात्र आपण साईबाबा हिंदू की मुसलमान या वादात अडकून पडलो आहोत. शंकराचार्यानी साईबाबा मुसलमान असल्याचा दावा करत हिंदूना

दर्शनास न जाण्याचे आवाहन केले आहे तर कांदिवली येथील साईधाम ट्रस्टचे जोशी यांनी साईबाबा हिंदू असून एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला असल्याचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. आपण संताना जातीपातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र हि मुकी जनावरे कोणत्याही जातीच्या बंधनाला न मानणारी आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 08:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close