S M L

ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Sep 16, 2014 03:19 PM IST

ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

16 सप्टेंबर :   अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या देवळालीत एक अतिशय दु:खद घटना घडली आहे. घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळणार्‍या दोन चिमुकल्यांचा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने जीव गमवावा लागला आहे. शिवाजी तावरे यांची पाच वर्षांची अनुष्का आणि दोन वर्षांचा प्रथमेश ट्रॅक्टरवर खेळत होते. पण ट्रॅक्टरची चावी काढायचं शिवाजी तावरे विसरून गेले. विहिरीजवळच हा ट्रॅक्टर होता. मुलांनी चावी फिरवली आणि ट्रॅक्टर तीस फूट विहिरीत कोसळळा आणि या दोन्ही चिमुकल्यांचा दुदैर्वी अंत झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close