S M L

मनमोहन सिंग यांची राष्ट्रपतींना भेट

20 मे, नवी दिल्ली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची थोड्याच वेळापूर्वी भेट घेतली.आणि नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही होत्या. 322 खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिलं. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि 4 अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याचं हे पत्र आहे. शुक्रवारी 22 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना सादर केलेलं 322 खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र राष्ट्रपतींनी मान्य केलं आहे. नव्या सरकारचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग हे शुक्रवारी 22 तारखेला कधी त्यांच्या नव्या पदाचा कधी शपथ विधी घेणार आहेत हे आतापर्यंततरी कळलेलं नाहीये. मनमोहन सिंग यांना 274 घटक पक्षाच्या खासदारांनी पाठिंबा दिला आहे. या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल मिळून 48 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.नव्या सरकारमध्ये युपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांना देण्याचं एकमताने मान्य झालं आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी युपीएच्या सगळ्या घटक पक्षांची आज बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम आणि ए.के. अँटनी या काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, द्रविड मुन्नेत्र कळघमचे (डीएमके) अध्यक्ष एम करुणानिधी यांनी हजरे लावली होती. राजचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांना या बैठकीचं आमंत्रण दिलं नव्हतं. आजच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रायल मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्यामुळे यंदा त्यांना कोणतं खातं मिळतंय याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2009 01:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2009 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close