S M L

काँग्रेसचा स्वबळाचा नारा, सोनियांकडे 288 जागेची यादी

Sachin Salve | Updated On: Sep 16, 2014 09:12 PM IST

Congress and sonia16 सप्टेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ फोडला खरा मात्र जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. आता तर काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेसच्या छाननी समितीने पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे 288 उमेदवारांची यादीच पाठवली आहे.

आघाडीतल्या जागावाटपाचा तिढा कायम असतानाच काँग्रेस स्वबळावर लढणार की काय अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसच्या छाननी समितीने पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे 288 जागांसाठी उमेदवारांची यादी पाठवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

काँग्रेसच्या छाननी समितीने सर्व 288 जागांवर उमेदवार निवडले आहेत. दुपारी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक संपली. त्यांनतर 288 उमेदवारांची यादी सोनियांना पाठवल्याचं सूत्रांकडून समजतंय.

आता काँग्रेस स्वबळावर लढणार की काँग्रेसचं हे दबावतंत्र आहे, यासाठी काही काळ थांबावं लागेल. विशेष म्हणजे 9 राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने यशाची चव चाखली आहे. त्यामुळे काँग्रेसने स्वबळाची तयारी करतंय की काय अशी शक्यता निर्माण झालीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close