S M L

'टोमॅटो बाबा'वर कारवाई होणार?

Sachin Salve | Updated On: Sep 16, 2014 07:33 PM IST

'टोमॅटो बाबा'वर कारवाई होणार?

pune tomato baba16 सप्टेंबर : एकीकडे 'सर्वात पुढे महाराष्ट्र माझा' असा टेंभा सरकार मिरवत आहे पण दुसरीकडे अजूनही राज्यात अंधश्रद्धेनं जखडलेली प्रकरणं समोर येत आहे. 'टोमॅटो ज्यूस प्या बरं व्हा' असं दुकान मांडलेल्या 'टोमॅटो बाबा'ची आता चौकशी होणार आहे. यवत पोलिसांनी याबाबत कारवाई करणार असल्यांचं स्पष्ट केलंय.

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे फिरंगाईमाता मंदिराजवळ टोमॅटो ज्यूस प्यायल्यानं व्याधी बर्‍या होतात, अशी अंधश्रद्धा पसरवणारा नितीन थोरात महाराज याचं 3 वर्षापासून हे दुकान सुरू आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या या बाबाकडून मिळणारा टोमॅटो ज्यूस पिण्यासाठी मोठी गर्दी या परिसरात होते.

नितीन महाराज देत असलेल्या टोमॅटो ज्यूसचे नमुने आणि औषध प्रशासनानं गोळा केले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकार्‍यांनी नितीन महाराज थोरात यांची भेट घेतली तेव्हा ते कोणती वनस्पती वापरतात त्याचं नावंही सांगू शकले नाहीत. औषध विबागाचा अहवाल यायचा असून अन्न विभागाच्या अहवालात टोमॅटो ज्यूस असल्याचं आढळून आलंय.

हा ज्यूस अमृत रस म्हणून वेगवेगळ्या व्यादींवर उपाय म्हणून मोफत वाटला जातोय असं या अधिकार्यांच्या निदर्शनास आलंय. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालंय. आता पोलीस या भोंदूबाबावर कारवाईसाठी वकीलांचा सल्ला घेत आहे. भोंदू बाबाच्या औषधी प्रकरणाची पोलीस चौकशी करणार आहेत. यवत पोलिसांनी याबाबत कारवाई करणार असल्याचं सांगितलंय. नवीन जादुटोणा कायद्यानुसार कारवाई करता येते का याबाबत वकिलांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close