S M L

एस. टी. च्या ताफ्यात मसिर्डीजच्या चार बसेस दाखल

20 मे, अमृता दुर्वेएस.टी. आणि मर्सिडीज...ही दोन नावं एकत्र येऊ शकतात का?...पण आता हे खरं आहे... लाल डब्याच्या एस.टी.च्या ताफ्यात मुंबईमध्ये 4 नव्या मर्सिडीज बसेस दाखल झाल्या आहेत. चकचकीत निळा रंग, आरामदायी सीट्स आणि भरपूर लेगरूम अशा थाटात एस.टी. च्या या 4 नव्या शानदार मर्सिडीज बस दिमाखात शिवनेरीच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्या आहेत. आधीच्या बसेसपेक्षा या बसचा पिक - अप आणि सस्पेन्शन चांगलं असेल असं समजतंय. दादर - पुणे मार्गावर या बसेसच्या रोज फेर्‍या असतील आणि मुंबई- नाशिक मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरही एस.टी. मसिर्डीज बसेस धावतील. 225 रुपयांच्या त्याच माफक दरात नवीन बसमध्ये प्रवास करायला मिळाल्याने प्रवासीही खुश आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2009 02:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2009 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close