S M L

आघाडीत जागावाटपावरून 'टिकटिक' वाढली

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2014 04:05 PM IST

35pawar_cm_ncp19 सप्टेंबर : युती जागावाटपावरुन महायुद्ध रंगले असताना दुसरीकडे आघाडीमध्येही घोळ कायम आहे. काँग्रेसनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

तसंच आज राष्ट्रवादीने दिलेला अल्टीमेटमही संपणार आहे. हा निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम असतानाचकाँग्रेसने जागा वाढवून देण्यास नकार दर्शवला आहे.

तर काँग्रेसकडून प्रतिसादर मिळाला नाही असं तटकरे यांनी सांगितलं. आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी परदेश दौर्‍यावर दिल्लीत परतणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांची भेट घेणार असून जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2014 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close