S M L

'आमच्या जागा घ्या पण महायुती तोडू नका'

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2014 05:54 PM IST

'आमच्या जागा घ्या पण महायुती तोडू नका'

19 सप्टेंबर : महायुती टिकवण्यासाठी घटकपक्षांची धावाधाव सुरू झाली आहे. आम्हाला कमी जागा मिळाल्या तरी चालतील पण महायुती टिकवा, अशी विनंती घटकपक्षांनी सेना-भाजपला केली आहे. दुसरीकडे आता भाजपनेही नरमाईची भूमिका घेतलीये.

युतीत समन्वयाचा अभाव आहे, एकमेकांना किती जागा वाटून घ्यायच्या आहेत यावरून वाद सुरू आहे अशी कबुली स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीय. तसंच युतीच्या नेत्यांनी घटकपक्षांना फक्त 18 जागा देण्याचा विचार केलाय पण हा आमच्यावर अन्याय असून सुद्धा आम्ही ते मान्य करतो असंही शेट्टी ते म्हणाले. तर घटकपक्षांना कमीत कमी जागा द्यायच्या आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जागा घ्यायचा असं सेना आणि भाजपचं सुरू आहे. आम्हाला एखादी जागा कमी भेटली तरी चालेल पण महायुती टिकली पाहिजे अशी भूमिका रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी मांडली. घटकपक्षांना कमी जागा मिळाल्या तरी चालेलं पण महायुती तोडू नका अशी विनंती आपण उद्धव ठाकरे यांना केली असून त्यांनी सकारात्मकता दर्शवलीये अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली. एकंदरीतच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी युतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे पण घटकपक्षांना लोकसभेचं यश पाहता विधानसभेत महायुती कायम राहावी अशी भूमिका मांडलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2014 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close