S M L

'ही दोस्ती तुटायची नाय',भाजपकडून 135-135 जागांचा प्रस्ताव

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2014 12:41 PM IST

'ही दोस्ती तुटायची नाय',भाजपकडून 135-135 जागांचा प्रस्ताव

19 सप्टेंबर : जागावाटपावरुन महायुतीत सुरू असलेलं महायुद्ध संपुष्टात येण्याची चिन्ह आहे. 'ही दोस्ती तुटायची नाय'असा सुरू आता शिवसेनेनंही लगावलाय. भाजपनं शिवसेनेकडे तडजोडीचा नवा फॉर्म्युला पाठवला. 135-135 जागांचा हा नवा प्रस्ताव आहे. पण भाजप 130 जागांपर्यंत तडजोडीला तयार होण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. तर त्याअगोदर सेनेकडून आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत युती तुटणार नाही अशी ग्वाही दिलीये. पण त्याचबरोबर 150 जागांवर आम्ही ठाम आहोत असंही स्पष्ट केलंय.

जागावाटपावरून सुरू झालेलं महायुतीतलं महायुद्ध रंगतदार होत चाललंय. अखेर महायुती तुटणार नाही, असं शिवसेना नेत्यांनी सांगितलं. मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला काँग्रेसमुक्त करायचं आहे आणि हा दोन्ही पक्षाचा हा मनोदय आहे त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी मिळून ही युती स्थापन केली. त्यामुळे एकत्र राहुनच महाराष्ट्राचा विकास करायचाय. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आमच्याकडून कुणालाही अडचण नाही. महाराष्ट्रासाठी जे चांगलं करायचं त्यासाठी आम्ही पुढाकार घेणारच आहे पण 150 जागांची मागणीवर ठाम असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आज दुपारी भाजप नेत्यांची बैठक झाली आणि भाजपनं 119 जागांचा प्रस्ताव अमान्य करत चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला. त्यानंतर शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर जागावाटप आज रात्री निश्चित होईल, उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं सुभाष देसाईंनी सांगितलं. यापूर्वी भाजपनं अनेक तडजोडी केल्या आहेत. तेव्हा शिवसेनेने आता विचार करावा, असं भाजपचं म्हणणं होतं. शिवसेनेनं ज्या कधीच जिंकल्या नाही, अशा 59 जागांवर चर्चा व्हायला हवी, अशी भाजपची भूमिका आहे. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा झालीय. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2014 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close