S M L

सिंचन घोटाळ्या प्रकरणी पवार-तटकरेंची होणार चौकशी?

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2014 10:46 PM IST

सिंचन घोटाळ्या प्रकरणी पवार-तटकरेंची होणार चौकशी?

20 सप्टेंबर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. सिंचन घोटाळ्याची अँटीकरप्शन ब्युरोमार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत आणखी भर पडलीये.

11 सप्टेंबरला गृहविभागाने फाईल क्लिअर केल्यानंतर आज चौकशीसाठी परवानगी दिली. मुख्य सचिवांकडून ही फाईल आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आली आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि इतर लोकप्रतिनिधींच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक आहे. या घोटाळ्याचा फौजदारी तपास होणार असल्याचंही समजतंय. तर याबद्दल मला काहीही माहित नाही, आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे मी काही बोलणं योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. पण याप्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असा दावा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2014 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close