S M L

राजकीय पक्षांना 'काकस्पर्शा'ची धास्ती

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2014 02:18 PM IST

राजकीय पक्षांना 'काकस्पर्शा'ची धास्ती

pitru paksha  vs ncp bjp congress20 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झालीये. कार्यकर्ते प्रचारासाठी बाह्यावर करुन तयार आहे पण जागावाटपाचा तिढा सुटलाच नसल्यामुळे कार्यकर्ते बुचकाळ्यात सापडले आहे. पण जागावाटप आणि उमेदवाराची नावं जाहीर न करण्याचं जरा वेगळंच कारण समोरं आलंय. सध्या पितृ पक्ष सुरू असल्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर न करण्यासाठी टाळाटाळ करत आहे.

आघाडी आणि महायुतीतलं जागावाटप काही केल्यानं संपताना दिसत नाहीये. सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असल्या तरी कोणताही राजकीय पक्ष पितृ पक्षामुळे आपले उमेदवार घोषित करत नाही आहे. हा केवळ अंधश्रद्धेचा भाग असल्याचं खगोल शास्त्रज्ञ दामोदर सोमण सांगत आहेत. या पितृ पक्षाचे काही लोक गैरसमज पसरवत आहेत असे सांगून या अंध श्रद्धेमुळे पुढेपुढे निर्णय ढकललं जात

असल्याचे समोर येतंय. या उलट पितृ पक्षात या राजकीय पक्षांनी अंध श्रद्धेला वाढवू नये त्यांनी या काळात प्रचार करावा अर्ज भरावेत असे आवाहन सोमण यांनी केलंय. राजकीय नेते लोकांसमोर आदर्श असतात त्यांनी चांगले संस्कार लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन करून सोमण यांनी पितृ पक्ष अशुभ नसल्याचे सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2014 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close