S M L

...हे गाव विकणे आहे !

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2014 05:49 PM IST

...हे गाव विकणे आहे !

latur devangrvadi20 सप्टेंबर : ग्रामीण भागातल्या नागरिकांना मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाकडून करोडो रूपये खर्च होत असताना लातूर जिल्ह्यातल्या देवंग्रावाडी गावात या योजना पोहोचत नाही. रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत सुविधाच नसल्यानं इथल्या गावकर्‍यांनी चक्क गावच विकायला काढलंय.

जनहितकारी योजनांचा मोठा गाजावाजा करत अनेक योजना लोकांपर्यंत पोहचविल्याच शासन सांगतंय. मात्र लातूर जिल्ह्यातलं देवंग्रावाडी हे गाव स्वातंत्र्याच्या काळापासून ते आजघडीला देखील मुलभूत सुविधांपासून वंचितच आहे.

ग्रुप ग्रामपंचायतीत येणार्‍या जेमतेम शंभर घरे असलेल्या या गावाची लोकसंख्या जवळपास चारशे ते पाचशे इतकी आहे. मात्र या गावात जायला रस्ताच नाही. पावसाळ्यात तर थोडाही पाऊस पडल्यास या गावाचा संपर्कच तुटतो. त्यातच जागोजागी भले मोठाले उकिरडे असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न या गावकर्‍यांना नेहमीचाच झालाय.

फक्त चौथीपर्यंत असलेली इथली शाळा देखील उकिरड्याच्या विळख्यात आणि चिखलाच्या रस्त्यावरच भरते. वेळोवेळी प्रशासनाकडे हात पसरून सुद्धा काहीच न मिळाल्याने इथल्या त्रस्त ग्रामस्थांनी हे गावच विकण्याचा निर्णय घेतलाय. आरोग्याची कोणतीच सुविधा नसल्याने इथल्या ग्रामस्थांना तालुक्याचं ठिकाण गाठावं लागतं. मात्र पावसाळ्यात एखादा रुग्ण गावाबाहेर नेण्यासाठी या गावकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढंच काय तर गंभीर रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेणं देखील शक्य नसल्यान अनेक रुग्णांना गमवावं लागल्याची खंत देखील गावकर्‍यांनी सांगितली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2014 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close