S M L

'शिवसेनेचा अखेरचा फॉर्म्युला भाजपला अमान्य'

Samruddha Bhambure | Updated On: Sep 21, 2014 03:54 PM IST

'शिवसेनेचा अखेरचा फॉर्म्युला भाजपला अमान्य'

21 सप्टेंबर :  युती टिकवायची दोन्ही पक्षांची असेल तर अंतिम प्रस्ताव कधीच नसतो. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप खूश असल्याचे स्पष्ट करत यासंदर्भात टीव्हीच्या माध्यमातून चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करावी असं प्रत्युत्तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेला दिले आहे. मात्र युती कायम राहावी हीच भाजपचीही इच्छा असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीमधील खेचाखेची अद्यापही सुरुच असल्याचे दिसते.

शिनसेना-151, भाजप-119 आणि मित्रपक्ष-18 जागा असा अखेरचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळी भाजपसमोर ठेवला होता. त्याला प्रत्युत्तर देत 'शिवसेनेकडून देण्यात आलेल्या 119 जागांवर आम्ही पूर्वीपासूनच लढत आलो आहोत. पण भाजपला 19 तर शिवसेनेला 59 जागांवर आत्तापर्यंत कधीच विजय मिळालेला नाही. या जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. याचा फायदा युतीलाच होईल असं विनोद तावडे म्हणाले.

भाजपच्या कोअर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक झाली. त्याला विनोद तावडे आणि एकनाथ खडसे हे राज्यातले नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. आम्ही शिवसेनेला लोकसभेच्या जागा वाढवून देत गेलो, त्यांनी मात्र आम्हाला विधानसभेच्या जागा वाढवून दिल्या नाहीत. युती कायम राहावी यासाठी भाजपने नेहमीच जागांचा त्याग केला आहे. या उलट शिवसेनेने आजपर्यंत भाजपला एकही जागा वाढवून दिलेली नाही असा पुनरुच्चार एकनाथ खडसे यांनी केला. युती झाली त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप 32 तर शिवसेना 16 जागांवर निवडणूक लढवायची. यानंतर भाजपने शिवसेनेला सहा जागा वाढवून दिल्या. तसेच महायुती भक्कम करण्यासाठी आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून जागा दिली. तर युती झाल्यापासून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेन भाजपला फक्त 2 जागाच वाढवून दिल्या आहेत असे एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप आधीपासून 119 जागांवर निवडणूक लढवत आली असून शिवसेनेच्या प्रस्तावात नवीन काहीच नसून यावर भाजप समाधानी नाही असे खडसे यांनी स्पष्ट केले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2014 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close