S M L

डेडलाईन देऊन चर्चा होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 22, 2014 09:57 AM IST

prithviraj

21 सप्टेंबर :   महायुतीप्रमाणे आघाडीतही जागावाटपावरून चांगलीच रस्सीखेच सुरूय. आघाडी व्हावी, असं आमचं मत आहे. पण, त्यासाठी कुणी डेडलाईन देऊ नये, असा इशाराच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला दिलाय. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज दक्षिण कराडमधून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली.

नवी मुंबईमध्ये आज दक्षिण कराडच्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसची यादी उद्या जाहीर होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच आपण दक्षिण कराडमधून निवडणुकीला इच्छुक असल्याचं पश्रक्षेष्ठींना कळवलंय, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यानंतर मात्र माझ्या नेतृत्त्वाखाली निवडणूक होतेय तेव्हा मला दक्षिण कराडमधून उमेदवारी मिळाली पाहिजे, असं म्हणत त्यांनी मतदारांना भरगोस मतदान करण्याचं आवाहनही केलं.

दुसरीकडे, आता जास्त वेळ नाहीये, काँग्रेसनं लवकर जागावाटपाचा निर्णय घ्यावा असं आवाहन सुनील तटकरेंनी IBN लोकमतशी बोलताना केलं. आम्ही काँग्रेसच्या प्रस्तावाची वाट बघतोय, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2014 08:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close