S M L

फ्राय डे रिलीज

21 मे, बरेच दिवस चर्चेत असलेला 'निशाणी डावा अंगठा सिनेमा' या आठवड्यात रिलीज होतोय. पुरुषोत्तम बेर्डेंचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा साक्षरता अभियानाच्या बट्‌ट्याबोळावर अवलंबून आहे. सिनेमात उपरोध पेरलाय. निर्मिती सावंत, अशोक सराफ , दिलीप प्रभावळकर,मकरंद अनासपुरे असे बडे कलाकार सिनेमात आहेत. रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या पारितोषिक मिळालेल्या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे. बॉलिवुडमध्ये 'डिटेक्टिव्ह नानी' सिनेमा रिलीज होतोय. नानीचं काम केलंय आवा मुखर्जीनं. एका कॉलनीत एक गुन्हा घडतो आणि त्याचा शोध घेते डिटेक्टिव्ह नानी. आपल्या छोट्या दोस्तांबरोबर ही नानी गुन्हेगाराचा शोध घेते, अशी सिनेमाची कथा. सिनेमाचं दिग्दर्शन केलंय रोमिला मुखर्जीनं आणि संगीत दिलंय जॉली मुखर्जीनं. सिनेमा विनोदी ढंगाचा आहे.इंग्लिश सिनेमा रिलीज होतोय 'ओशन ऑफ द ओल्ड मॅन'. यात मुख्य भूमिका आहे टॉम ऑल्टरची. एक शिक्षक आणि त्याचे विद्यार्थी यांच्या नातेसंबंधांवर हा सिनेमा आहे. सुनामीमध्ये वृद्ध शिक्षकाचं कुटुंब वाहून जातं. वाताहत होते. आणि मग शिक्षक हरवलेल्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू करतो. राजेश शेरानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या वीकेण्डला खूप सिनेमे रिलीज होत नसले तरी प्रेक्षकाकंडे काही पर्याय नक्कीच आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2009 04:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2009 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close