S M L

आता विमानातही बोला मोबाईलवरून

21 मे, हॅलो...हां...मी सध्या विमानात आहे...असं वाक्यही येत्या काही दिवसातच कानावर येऊ शकतं...आता विमानातून प्रवास करतानाही तुमची महत्वाची कामं खोळंबून राहणार नाहीत कारण लवकरच विमानात बसूनही मोबाईलवरुन बोलता येणं शक्य होणार आहे. पॅरामाऊंट एअरवेजनं आणि सॅटकॉम कंपनीच्या प्रयत्नांमुळे आता हे साध्य होणार आहे. पॅरामाऊंट एअरवेज प्रायोगिक तत्वावर चेन्नई ते दिल्ली या मार्गासाठी ही सर्व्हिस सुरू करणार आहे. भविष्यात इतर एअरलाईन्स कंपन्याही यावर विचार करतील अशी शक्यता आहे. तुमच्या मोबाईलला विमानात सीमलेस कनेक्ट्ीव्हीटी मिळेल आणि त्यामुळे तुम्ही मोबाईलवर कॉल रिसिव्ह करु शकाल, बोलू शकाल आणि याचं बिल तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर पाठवेल, अशी माहिती पॅरामाऊंट एअरवेज एमडी एम. थियागराजन यांनी दिली.दुबईच्या एमिरेटस् एअरलाईन्सनं गेल्याच वर्षी त्यांच्या विमानात मोबाईल सर्व्हिस सुरु केली आहे. ही सर्व्हिस सुरू करण्यासाठी विमानात पन्नास किलोचं एक उपकरण बसवावं लागतं जे थोडक्यात विमानातल्या मोबाईल टॉवरचं काम करतं ज्यामुळे प्रवाशांना विमानातही कॉल घेणं शक्य होतं. विशेष म्हणजे ही विमानातली रोमिंग फॅसिलिटी देण्यासाठी एअरलाईन्स कोणताही चार्ज लावणार नाहीयेत. येत्या सप्टेंबरपर्यंत डिजीसीएकडून मंजुरी मिळाल्यानंतर पॅरामाऊंट एअरवेज ही सर्व्हिस सुरू करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2009 04:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2009 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close