S M L

'आमची गरज नसेल तर आम्हालाही तुमची गरज नाही'

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2014 08:18 PM IST

athavale_news22 सप्टेंबर : महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असल्यानं घटकपक्ष कमालीचे अस्वस्थ झाले आहे. शिवसेना आणि भाजपला आमची गरज नसेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही, असा इशाराच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यांच्यापाठोपाठ राजू शेट्टी, महादेव जानकर यांनी युतीच्या जागावाटपाच्या तिढ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

महायुतीत जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटेना त्यामुळे आता महायुतीच्या घटकपक्षांचा धीर सुटत चाललाय. उद्या मंगळवारी दुपारपर्यंत तिढा न सोडवल्यास राष्ट्रीय समाज पक्ष 125 जागांवर उमेदवार उभे करेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर दिलाय.

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीही नाराज झाले आहेत. आम्ही प्रामाणिकपणे मध्यस्थीचा प्रयत्न केलाय, जो काही निर्णय घ्यायचाय तो लवकर घ्या असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. चार घटकपक्ष एकत्रित राहिले तर दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला आहे. दोन्ही मोठे पक्ष स्वबळावरच जाणार असतील तर आमची 60-70 जागांवर उमेदवार देण्याची तयारी आहे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय. जागावाटपाच्या तिढ्यात युतीने घटकपक्षांना 18 जागा सोडल्या आहेत एवढेच नाहीतर कालपर्यंत जागा कमी पडत असतील तर आमच्या काही जागा घ्या पण युती तोडू नका असा सल्ला आठवले आणि शेट्टी देत होते पण तिढा काही सुटत नसल्यामुळे आठवलेंनी थेट आता आक्रमक पवित्रा घेतलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2014 07:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close