S M L

युतीचा 'फॉर्म्युला' जमेना, भाजप 130 जागांवर ठाम

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2014 11:55 AM IST

युतीचा 'फॉर्म्युला' जमेना, भाजप 130 जागांवर ठाम

22 सप्टेंबर : महायुतीत जागावाटपाचा तिढा आता आणखी चिघळत चाललाय. भाजपने आता 130 जागांवर लढण्यास तयारी दर्शवली असून 130 पेक्षा एक जागाही कमी घेणार नाही अशी ठाम भूमिका मांडली आहे. मात्र शिवसेना 151 जागेवर ठाम आहे. शिवसेनेनं 151-119-18 जागांचा प्रस्ताव मांडला आहे.

भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. पत्रकारांशी बोलतांना रुडी म्हणाले की, भाजपची मागणी आक्रमक नसून लवचिक आहे त्यामुळे आम्ही 130 जागांवर ठाम असून त्यावरच लढण्यास तयार आहे असं स्पष्ट केलं. दुसरीकडे भाजप जुन्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचं भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितलंय. त्याचवेळी शिवसेनेशी चर्चा करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आता ओम माथूर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे भाजपची उद्या मंगळवारी मुंबईत तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, आणि आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. भाजप- शिवसेना चर्चेची दारं बंद झालेली नाहीत, मात्र मीडियाच्या माध्यमातून चर्चा नको असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

भाजपचा प्रस्ताव

भाजप - 130 , सेना 140 जागा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2014 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close