S M L

ITPLमध्ये रॉजर फेडरर भारताकडून खेळणार

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2014 09:37 PM IST

ITPLमध्ये रॉजर फेडरर भारताकडून खेळणार

22 सप्टेंबर : टेनिस क्षेत्रातला आघाडीचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर आता भारताकडून खेळणार आहे. भारताकडून खेळणार म्हणजे इंटरनॅशनल टेनिस प्रिमियर लीगमध्ये रॉजर फेडरर भारताच्या एका फ्रँचायझीतर्फे खेळणार आहे.

फेडररबरोबर पीट सॅम्प्रास आणि सानिया मिर्झा हेही या फ्रँचायझीमध्ये असणार आहेत. एका आयटी कंपनीच्या मालकीची ही फ्रँचायझी आहे. भारताबरोबरच यूएई, फिलीपाईन्स आणि सिंगापूरच्या फ्रँचायझीदेखील आयटीपीएलमध्ये सहभाग घेणार आहेत. ही मुख्यतः आशियाई लीग असणार आहे.

त्यामध्ये विजेत्या टेनिसपटूला 10 लाख डॉलर्सचं बक्षीस मिळणार आहे. भारताच्या महेश भुपतीच्या संकल्पनेतून आयटीपीएलचा उदय झालाय. या टीममध्ये आधी राफेल नादाल खेळणार होता, पण दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. त्यानंतर या फ्रँचायझीनं फेडररला संपर्क साधला. फेडररने यास होकार दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2014 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close