S M L

'ड्रॅगन'शांत झाला, 'हिंदी चिनी भाई-भाई'चा दिला नारा

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2014 09:54 PM IST

Modi with Jhimping_meeting22 सप्टेंबर : 'हिंदी चिनी भाई-भाई' याचे सूर आता उमटू लागले आहे. सीमेवर सुरू असलेल्या वादावर 'ड्रॅगन'चा संशय आता निवळलाय. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारतभेटीनंतर दोन्ही देशांदरम्यानचे काही संशय निवळायला मदत झाली आहे असा खुलासा चीन सरकारने केला आहे.

शी जिनफिंग गेल्याच आठवड्यात भारतात येऊन गेले. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांच्या संबंधांच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आणि सीमावादाचा प्रश्न मैत्रीपूर्ण वातावरणात सोडवण्यावर एकमत झालं अशी माहिती चीनच्या परराष्ट्र खात्यातर्फे देण्यात आली आहे.

सीमावाद सोडवण्याच्या दृष्टीने परिणामकारक संभाषणाचा वापर केला जाऊ शकतो. सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देश त्याचा वापर करतील अशी आशा चीनच्या परराष्ट्र खात्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जिनपिंग यांनी भारत दौर्‍यावर असतांना भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्याअगोदरही अनेक वेळा घुसखोरी करून भारतीय हद्दीवर आपला हक्क सांगितला होता. मात्र भारत भेटीच्या दरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाहुणचारामुळे जिनपिंग भारावून गेले. भारतानेही सीमारेषेच्या मुद्यावरून चीनला समज दिला. एवढेच नाहीतर दोन्ही देशामध्ये तब्बल 20 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा करार झाला आहे त्यामुळे आता ड्रॅगनने शांततेचा मार्ग स्वीकारला असं दिसून येतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2014 09:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close