S M L

ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Sep 23, 2014 10:06 AM IST

ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं निधन

shankar vaidya22 सप्टेंबर :  शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हदयांमुधुनी अरुणोदया झाला..., स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला..., अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी गेली सहा-सात दशकं काव्य रसिकांच्या मनावर राज करणारे ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते.

दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये कवी शंकर वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव सकाळी 10.30 वा. पोर्तुगीज चर्चजवळच्या घरी आणणार असून दुपारी 12च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. कवी शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928 झाला. ओतूर हे त्यांचं जन्म गाव.

आला क्षण, गेला क्षण हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध आहे. 'पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई' ही त्यांची कविता प्रसिद्ध होती. भावनाशील कवी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांचे कालस्वर, दर्शन, सांजगुच्छ, मैफल, पक्षांच्या आठवणी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'रथयात्रा' आणि 'प्रवासी पक्षी' या पुस्तकांचं हिंदी रूपांतर केलं आहे. अनेक नवोदित कवींना शंकर वैद्य सतत प्रोत्साहन द्यायचे. वैद्य यांच्या निधनामुळे मराठी काव्यक्षेत्र पोरकं झालं आहे अशी भावना व्यक्त होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close