S M L

आघाडीत बिघाडी कायम, आज रात्री पुन्हा होणार चर्चा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 23, 2014 01:47 PM IST

आघाडीत बिघाडी कायम, आज रात्री पुन्हा होणार चर्चा

23 सप्टेंबर : आघाडी कायम राहावी यासाठी दोन्ही काँग्रेसमध्येही प्रयत्न सुरू आहेत. जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज (मंगळवारी) सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक घेतली पण ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) रात्री पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते मुंबईत बैठक घेऊन आघाडीविषयी अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिले आहे. रात्री आठ- साडेआठच्या सुमारास दोन्ही पक्षांचे नेते चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक घेतील अशी माहितीही नारायण राणे यांनी दिली.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीपाठोपाठ आघाडीमध्येही जागावाटपावरून तणाव कायम आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने 124 जागा द्यायची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे आणि हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close