S M L

आघाडीचं तळ्यात-मळ्यात, मुख्यमंत्रीपदावरून वाटाघाटी ?

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2014 11:48 PM IST

cm_on_ncp23 सप्टेंबर : जागावाटपावरून आघाडीचं अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे. उद्या जर काही कारणाने आघाडी तुटली तर त्याचा दोष काँग्रेस पक्षावर येऊ नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांची मागणी करताना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव दिलाय, अशी माहिती काँग्रेसच्या प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी नाशिकामध्ये दिली.

पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर बोलण्यावर नकार दिला आहे. दरम्यान, आज रात्री आघाडीची बैठक पुढं ढकललं जाण्याची शक्यता आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा मालेगावात मेळावा आणि दुसरीकडे काँग्रेस नेत्यांच्या पुर्वनियोजित बैठक रद्द होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या 174 जागांची तयारी पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. यातल्या 6 जागांचे पूर्णाधिकार सोनियांना

दिल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व जागा या महत्वांच्या असून नेते किंवा त्यांचे नातेवाईक या जागांवर इच्छुक आहेत.

 6 जागांचा तिढा

1) दक्षिण कराड

या जागेवर मुख्यमंत्री इच्छुक असून, विलासकाका उंडाळकरांचं पुनर्वसन करावं लागणार आहे.

2) भोकर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अनिता चव्हाणांना उमेदवारी हवी आहे

3) कुडाळ

नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना उमेदवारी हवीय

4) चिमूर

माजी मंत्री विजय वडेट्टीवारांना हा मतदारसंघ बदलून हवाय

5) नवापूर

स्वरूपसिंग नाईक यांना उमेदवारी हवीय, इथं

6) वरोरा

मंत्री संजय देवतळेंना उमेदवारी हवीय, मात्र पक्षातून विरोध होतोय

सातव्या जागीही वाद होण्याची शक्यता

7) यवतमाळ

माणिकराव ठाकरेंची पुत्र राहुल यांना उमेदवारी हवीय

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close