S M L

औरंगाबादेत पँथर-एमआयएममध्ये हातमिळवणी

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2014 10:22 PM IST

औरंगाबादेत पँथर-एमआयएममध्ये हातमिळवणी

panthar mim27 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पँथर्स रिपब्लिकन पार्टी आणि एमआयएममध्ये आता युती झाली आहेत. पँथर्सचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांनी याबद्दल माहिती दिली.

स्वतः गंगाधर गाडे हे औरंगाबाद पश्चिम मधून एमआयएम च्या सहाय्यानं लढत देणार आहेत. दलित मुस्लिम मतांचा सर्वच पक्षांनी स्वार्थासाठी वापर करून घेतलाय. एमआयएम मुस्लिम विकासाबद्दल बोलते आणि पँथर्सनेही दलितांच्या विकासासाठी लढा देत आहे.

दलित मुस्लिम विकासाचा समान धागा ठेवून आम्ही विधानसभेत विजयी होणार असल्याचं गंगाधर गाडे यावेळी सांगितलं. यावेळी एमआयएमचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जावेद कुरेशीही उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close