S M L

रिक्षाच्या प्रवासापेक्षाही स्वस्त आहे मंगळयानाची स्वारी !

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2014 09:19 PM IST

रिक्षाच्या प्रवासापेक्षाही स्वस्त आहे मंगळयानाची स्वारी !

 24 सप्टेंबर : अंतराळ संशोधनात भारताच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताच्या मंगळयानाने मंगळ कक्षेत प्रवेश केलाय. देशभरात याचा आनंद साजरा होतच आहे पण या मोहिमेच्या यशानंतर सोशल मीडियावर कौतुक आणि अभिनंदनाचा पूर आलाय. पण काही भन्नाट डोकीही लढवली जात आहे. 450 कोटी रुपये खर्च आलेल्या ही मोहिम एका ऑटोरिक्षाच्या प्रतिकिलोमिटर भाड्यापेक्षाही कमी आहे असं विश्लेषणही केलं जात आहे.

मंगळयानाने 67 कोटी किलोमिटरचा प्रवास पूर्ण करून आज पहाटे मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. जर प्रतिकिलोमीटरचा हिशेब पाहिला तर मंगळयानाला प्रतिकिलोमीटर 7 रुपये खर्च आला. राजधानी दिल्लीत रिक्षाचे प्रतिकिलोमीटर भाडे हे 7 रुपये आहे तर मुंबईत 10 रुपये इतके आहे. मंगळयानाचं वजन जवळपास 1350 किलोग्रॅम इतके असून याची बरोबरी एका छोट्या कारशी होऊ शकते. हॉलिवूडचा ऑस्कर विजेता सिनेमा 'ग्रेविटी' हा तयार करताना जितका खर्च आला होता तेवढ्या खर्चात भारताने मंगळ भरारी घेतली असे गौरवद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मंगळयानाच्या यशस्वी प्रवेशामुळे सोशल मीडियावर एकच पूर आला आहे. कुणी ग्रेविटीची खिल्ली उडवत आहे तर कुणी राजकीय पक्ष, पवार साहेबांचे धोरण.. इतरपर्यंत की काय मनसेची ब्ल्यू प्रिंटही सापडलीये अशी टिंगलटवाळकी सुरू आहे. 450 कोटी खर्च आणि 67 कोटी किलोमीटरचा प्रवास केला हा प्रवास फक्त सात रुपये प्रतिकिलोमीटर इतका आहे म्हणजे ऑटोरिक्षाच्या भाड्यापेक्षा कमी आहे अशा कमेंट वाचण्यास मिळत आहे. एवढंच नाहीतर मंगळ मिशनसाठी 450 कोटी खर्च आला पण दिवाळीला भारतात पाच हजार कोटींची नुसते फटाके फोडले जातात. आणखी एक ट्विट म्हणजे, 2004 मध्ये पंतप्रधानांच्या विदेश दौर्‍यावर 640 कोटी खर्च करण्यात आला होता. तर सरदार पटेल स्टच्यू ऑफ युनिटीसाठी 2500 कोटी खर्च येणार आहे. याच्या तुलनेत मंगळयानाचा खर्च चार पटीने कमी आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2014 09:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close