S M L

आघाडीत मतभेद विकोपाला, तिढा सुटता सुटेना !

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2014 10:56 PM IST

ajit pawar and cm24 सप्टेंबर : गेल्या महिन्याभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच काही सुटता सुटेना. आता तर आघाडीतील मतभेद विकोपाला पोहोचले आहेत. दोन्ही पक्षांनी अनेक जागांवर दावा सांगितला. राष्ट्रवादीने पुन्हा स्वबळाचा सूर आरवला आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा आणखी चिघळत चाललाय.

लोकसभेत अपेक्षीत यश न आल्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी दुख पचवून विधानसभेसाठी कंबर कसली. पण विधानसभेचं स्थानिक गणित पाहता राष्ट्रवादीने सुरूवातीपासून अधिक जागेची मागणी लावून धरली. विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात होऊन सुद्धा जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे आघाडीचं गाडं आहे त्या जागीच रुतलंय. आता तर आघाडीत मतभेद दिसून येत आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागांचा प्रस्ताव दिला असून 14 मतदारसंघाची नावंही कळवली आहे. मात्र राष्ट्रवादीकडून कोणताच निरोप न आल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता पसरलीये. अखेरीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराडमध्ये प्रचारासाठी निघून गेले आणि मुख्यमंत्री कराडमध्येच आज मुक्कामी आहेत. त्यामुळे आघाडीची बैठक होणार नाही हे स्पष्ट झालं. पण राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटाने स्वबळासाठी आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी तडजोडीची तयार नाही. 144 जागेची मागणी राष्ट्रवादीने कायम ठेवली आहे. आता उद्या आघाडीची बैठक होऊन जागावाटपाचा तिढा सुटतो का हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2014 10:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close