S M L

दोस्ती संपली, आघाडीही तुटली

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2014 11:26 PM IST

दोस्ती संपली, आघाडीही तुटली

25 सप्टेंबर : एकीकडे युतीचा संसार तुटला त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनेही काँग्रेसशी काडीमोड घेतला आहेत. गेली 15 वर्षांपासून एकत्र सत्तासंसार थाटलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागावाटपाच्या तिढ्यावरून घटस्फोट घेतला आहेत. एवढंच नाहीतर राष्ट्रवादी आता आघाडी सरकारमधून बाहेर पडणार आहे. अजित पवारांसह सर्वच मंत्री आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे.

आजपर्यंत काँग्रेसचा मुख्यमंत्री होत आला, आम्ही जागावाटपावरून काँग्रेसला अनेक वेळा माहिती दिली, वेळोवेळी प्रस्ताव मांडवा असा आग्रह धरला पण काँग्रेसने राष्ट्रवादीकडे साफ दुर्लक्ष केलं.

काँग्रेसने दिलेला 124 जागांचा प्रस्तावही आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे दुर्देवाने आघाडी तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. तसंच भविष्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन वेगळा विचार करणार असे संकेतही तटकरे यांनी दिले.

आघाडीचं 15 वर्षांचं राजकारण...

राजकारणात कुणीच कुणाचं शत्रू आणि मित्र नसतं. आघाडीचा धर्म हाच होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आले आणि

सत्तेसाठीच वेगळे झाले. मे 1999 मध्ये सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. राजकीय दृष्ट्या मात्र दोन्ही पक्ष कायम एकमेकांच्या जवळच होते. ऑक्टोबर 1999मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण निकालानंतर आघाडी झाली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आले. 2004 मध्ये

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यूपीएची स्थापना झाली आणि राष्ट्रवादीही त्यात सहभागी झाला. गेल्या 15 वर्षांच्या काळात दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र राहिले पण मतभेद कायम होते. राज्यात मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे अशी व्यवस्था होती.

केंद्रात शरद पवार हे मनमोहन सिंग यांचे विश्‍वासू सहकारी होते. सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे सूर फारसे जुळले नाहीत पण दोन्ही नेत्यांनी आघाडी पाळली. पण दोन्ही नेत्यांच्या पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या.राहुल गांधींनी देशभरात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा नारा दिला तर राज्यात अजित पवार नेहमीच मुख्यमंत्रीपदावर डोळा देऊन होते. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीला सांभाळून घ्यायचं पण पृथ्वीराज चव्हाण राज्यात आले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली.अर्थपुरवठाच बंद झाल्याने राष्ट्रवादीही घायकुतीला आला आणि मग मुख्यमंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती झाली. शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाल्याचा आरोप केला.

आदर्श, लवासा, सिंचन घोटाळा यावरून हे मित्रपक्ष एकमेकांना अडचणीत आणायला लागले. मुख्यमंत्र्यांनीच आपल्या खास शैलीत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीला जेरीस आणलं आणि अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली दरी आता आणखीनच मोठी झाली. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही काँग्रेसशी मैत्री ठेवण्यावरून मतभद झाले. महत्त्वाकांक्षी अजित पवारांना स्वबळाचे वेध लागले. लोकसभा निवडणुकीत काँग्रसचा दारुण पराभव झाला आणि राष्ट्रवादीला कारण मिळालं. आघाडी तोडतानाही राष्ट्रवादीनं हेच कारण पुढे केलं आणि स्वबळावर लढण्याचा नारा दिला. आघाडी दुभंगली आणि गेल्या 15 वर्षांतलं आघाडीचं सत्तेचं राजकारण संपुष्टात आलं.

राष्ट्रवादीची पत्रकार परिषद

सुनील तटकरे यांची माहिती

काँग्रेसकडून जागावाटपाचा प्रस्ताव नाही - तटकरे

समविचारी पक्षांना सोबत घेऊन सामोरं जाणार -तटकरे

स्वबळावर निवडणूक लढवणार -सुनील तटकरे

राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबा काढणार - अजित पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यात आघाडी -प्रफुल्ल पटेल

धर्मनिरपेक्ष सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे कायम प्रयत्न -प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीने नेहमीच काँग्रेसची साथ दिली -प्रफुल्ल पटेल

राज्यात नेहमीच काँग्रेसचा मुख्यमंत्री हे वास्तव -प्रफुल्ल पटेल

या निवडणुकीत शरद पवारांनी पुढाकार घेऊन सोनियाशी आघाडीबाबत चर्चा केली

आघाडी टिकावी हा आमचा प्रयत्न राहिला -प्रफुल्ल पटेल

एका महिन्यापूर्वी ऍटोनीनी शरद पवार आणि माझ्याशी चर्चा केली

काँग्रेसनं यापूर्वीच्या निवडणुकीत आमच्या जागा कमी केला

राष्ट्रवादीची ताकद पाहता निम्म्या जागांचा आमचा आग्रह -प्रफुल्ल पटेल

जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर सोडवण्याचे कॉंग्रेसला आवाहन -प्रफुल्ल पटेल

आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडली

आम्ही आजपर्यंत अनेकवेळा जागावाटपाबाबत आमची भूमिका मांडली -प्रफुल्ल पटेल

आघाडीचा धर्म पाळला - प्रफुल्ल पटेल

124 जागांचा पर्याय राष्ट्रवादीला मान्य नाही- प्रफुल्ल पटेल

मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा अडीच अडीच वर्षांचा करार करण्यासंबंधी चर्चा केली -प्रफुल्ल पटेल

महत्त्वाच्या वेळी संवादात कमतरता, प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीवर टीका

लवकरात लवकर तिढा सोडण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह - प्रफुल्ल पटेल

अधिकृत चर्चा केवळ एक दिवस झाली - प्रफुल्ल पटेल

यादी जाहीर केली आम्हाला माहितीही देण्यात आली नाही -प्रफुल्ल पटेल

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2014 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close