S M L

'इधर चला में उधर चला',आठवलेंचं तळ्यात-मळ्यात !

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2014 06:25 PM IST

'इधर चला में उधर चला',आठवलेंचं तळ्यात-मळ्यात !

26 सप्टेंबर : 'इधर चला में उधर चला जाने कहा में किधर चला' अशी अवस्था झाली आहे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची. गेल्या 25 वर्षांपासूनचा युतीचा संसार गुरुवारी मोडलाय. त्यामुळे घरातले काही 'सदस्य' लहान्याभावाकडे गेले परंतु रामदास आठवले अजूनही कुणाची वाट धरली नाही आणि कुणाचा झेंडा हाती घेतला नाही. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि भाजपशीही चर्चा सुरू आहे असं आठवले सांगत आहे. मात्र निर्णय अजूनही गुलदस्त्यात ठेवला आहे.

शिवशक्ती आणि भीमशक्ती असा नारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले युतीत दाखल झाले. महापालिका निवडणुका, लोकसभा निवडणुकीत आठवलेंनी युतीला चांगली साथ दिली. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचे वारे वाहु लागल्यामुळे महायुतीत महाफूट पडली. गुरुवारी भाजपने युतीशी घस्फोट घेतला. महाघटस्फोट झाल्यानंतर घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपशी लगेच घरोबा केला. पण रामदास आठवले मात्र बाजूला राहिले. काल रात्रीपासून भाजपचे नेते आठवलेंना भाजपच्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आठवलेंची फोनवर बातचीत झाली. आज दुसरा दिवस उजाडला तरी आठवलेंचा निर्णय काही झाला नाही. आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यानंतर

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांशी चर्चा सुरू असल्याचं आठवलेंनी सांगितलंय. आठवलेंनी दोन्ही पक्षांकडे 25 ते 30 जागांची मागणी केली आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेचे खासदार अनंत गितेंचा राजीनामा घेऊन त्या जागी मंत्रिपद देण्याचा सेनेचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी म्हटलंय. सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रिपद देण्याची ऑफरही सेनेनं दिल्याचा दावा आठवलेंनी केला आहे. तर भाजपकडूनही केंद्रात मंत्रीपदाची आरपीआयला ऑफर आली आहे. भाजपकडून केंद्रात मंत्रीपद आणि राज्यपालपदाची ऑफर आल्याची माहितीही आठवलेंनी दिली. त्यामुळे आठवलेंना 'इधर चला में उधर चला' असंच काहीसं झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2014 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close