S M L

मनसेचं इंजिन फॉर्मात, सेनेशी जोडणार का ?

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 12:54 PM IST

मनसेचं इंजिन फॉर्मात, सेनेशी जोडणार का ?

26 सप्टेंबर : महायुती आणि आघाडी तुटल्यामुळे मनसेचं इंजिन फॉर्मात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपल्या नेत्यांसोबत

खलबतं सुरू आहे. एवढंच नाहीतर मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रियाही काही काळ रोखण्यात आली होती. पण शिवसेनेने स्पष्ट केलंय की शिवसेना एकटीने लढणार आहे.

गेल्या 25 वर्षांचा युतीचा संसार अखेर मोडलाय. भाजपने घटकपक्षांना सोबत घेऊन वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे शिवसेना एकटी पडलीये. शिवसेना आणि मनसे यांचं नातं राजकीय जरी असलं तरी ठाकरे या नावाशी जोडलेलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांना टाळी देतील अशी चर्चा दबक्या आवाज सुरू आहे. आज सकाळपासूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रियाही काही काळ रोखण्यात आली होती. पण शिवसेनेने स्पष्ट केलंय की शिवसेना एकटीने लढणार आहे. सेनेच्या जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी यावर खुलासा केलाय. काही प्रसारमाध्यमं शिवसेना-मनसे युती होणार अशा आशयाच्या बातम्या पसरवून जनतेत गैरसमज पसरवत आहेत. शिवसेना ही विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने एकटी लढणार आहे.

परंतु सत्तेच्या सारीपाटावर कधी काय होऊ शकतं याचा नेम नाही. या अगोदर ही शिवसेनेसोबत येण्यासाठी उद्धव यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र राज यांनी टाळी देण्याऐवजी टोला लगावला होता. लोकसभा निवडणडणुकीतही पुन्हा एकदा अशीच चर्चा सुरू झाली होती. पण मोदीलाट आणि भक्कम महायुतीमुळे उद्धव यांनी हा विषय संपला असं जाहीर केलं होतं. त्यानंतर मात्र 'टाळी' ची शक्यता नाहीमध्येच जमा झाली होती. पण आता विधानसभेसाठी स्वबळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना एकटी मैदानात उतरणार आहे. तर लोकसभेत सुपडा साफ झाल्यानंतर मनसे सावध पवित्रा घेत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे टाळीचा निर्णय घेऊन राजकारणाला दिशा देतात की एकला चलो रे असा नारा देता हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2014 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close