S M L

मोदी पोहचले अमेरिकेत, असा होणार आहे दौरा !

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2014 11:53 PM IST

मोदी पोहचले अमेरिकेत, असा होणार आहे दौरा !

pm in newyork26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा आजपासून सुरू होतोय. गेले कित्येक दिवस या दौर्‍याची चर्चा होतेय. आज रात्री दहा वाजता मोदी न्यूयॉर्कमध्ये पोहचले आहेत.

अमेरिकेला पोहोचण्यापूर्वी मोदींनी जर्मनीत फ्रँकफुर्ट इथं मुक्काम केला. शनिवारी सकाळी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये ते भाषण करणार आहेत. मोदींच्या या भरगच्च दौर्‍यात 35 कार्यक्रमांचा समावेश आहे.

त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, महत्त्वाचे उद्योगपती आणि तिथल्या भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय श्रीलंका, बांगलादेश, आणि नेपाळच्या राष्ट्रप्रमुखांशीही ते चर्चा करणार आहेत. न्यूयॉर्कमधल्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये त्यांचं भाषण होणार आहे. या भाषणाची सर्व तिकिटं विकली गेली आहेत.

असा असेल मोदींचा अमेरिका दौरा

- 26 ते 30 सप्टेंबर असा 5 दिवसांचा दौरा

- 5 दिवसांच्या दौर्‍यात एकूण 35 कार्यक्रम

- दौर्‍यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही सहभागी होणार

- मोदी श्र्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणार

- 27 सप्टेंबर, रात्री 8 :00 ते 8 :15 न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण

- 27 सप्टेंबर - 9/11च्या स्मृतिस्थळाला भेट

- 27 सप्टेंबर, रात्री 8 :55 ते 10 :50

 न्यूयॉर्कमध्ये मॅडिसन स्क्वेअरमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण

- 29 आणि 30 सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची भेट

- वॉशिंग्टनमध्ये लिंकन मेमोरियललाही भेट देणार

तसंच जागतिक मुत्सद्देगिरी बरोबरच गुंतवणूकदारांना आकर्षित करणं हाही नरेंद्र मोदींच्या अजेंडा आहे. त्यांनी गुरुवारीच नवी दिल्लीत मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची घोषणा केली. यानंतर भारतामध्ये गुंतवणुकीच्या संधीला वाव मिळेल असा विश्वास मॉर्गन स्टॅनलेच्या रुचिर शर्मा यांनी व्यक्त केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2014 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close