S M L

अमित शहा मुंबईत दाखल, युतीबद्दल 'नो कमेंट'

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 01:36 PM IST

अमित शहा मुंबईत दाखल, युतीबद्दल 'नो कमेंट'

amit sha in mumbai27 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर आज (शनिवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौर्‍यावर आहेत. दुपारी ते मुंबईत दाखल झाले. युती तुटल्यावर ते पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत.

निवडणुकीच्या तयारीबद्दल ते राज्य भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. युती तुटल्यामुळे सर्वच पक्षांना आधीपेक्षा जास्त जागा लढवाव्या लागत आहेत आणि भाजपला एकहाती सत्ता मिळवण्याची इच्छा आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शहा यांचा मुंबई जौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची मैत्री तुटण्याबद्दल विचारलं असता त्यांनी याबद्दल बोलायला नकार दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close