S M L

अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात ?

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 05:28 PM IST

asokh chavan27 सप्टेंबर : काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी शक्यता आहे. अशोक चव्हाण आपल्या बालेकिल्ला नांदेडमधील भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

चव्हाण काँग्रेस हायकमांडच्या आदेशाची वाट पाहत आहे. जर हायकमांडने आदेश दिला तर अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरतील. विशेष म्हणजे तीनच दिवसांपुर्वीच अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी भोकरमधूनच स्वत:ची उमेदवारी जाहीर केली होती.

मात्र अचानक अशोक चव्हाण यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आलंय. काँग्रेसने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत पण तिसर्‍या यादीतही भोकर मतदारसंघाची उमेदवारी वेटिंगवर ठेवली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close