S M L

रामदास आठवले भाजपसोबत -फडणवीस

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 05:48 PM IST

रामदास आठवले भाजपसोबत -फडणवीस

 fadanvis on athavale27 सप्टेंबर : रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आमच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत काही जागेबद्दल चर्चा सुरू आहे पण ते लवकरच भाजपमध्ये सामील होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आरपीआयनं भाजपकडे 10 जागांची मागणी केलीय. आरपीआयला केंद्रात मंत्रिपद हवंय थोड्याच वेळात रामदास आठवले आणि अमित शहा यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आरपीआय- भाजप युतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी रामदास आठवले यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतलीय. त्यांची मुंबईच्या भाजप कार्यालयात बैठक पार पडली. जिंकून येण्यासारख्या जागा मिळाव्या अशी अपेक्षा आरपीआयनं व्यक्त केलीय.

दरम्यान आपण केंद्रीय मंत्रीपदाची मागणी केलीय. याविषयी सकारात्मक बोलणी झाल्याचं रामदास आठवले म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close