S M L

शिवसेना पंकजा मुंडेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2014 07:48 PM IST

शिवसेना पंकजा मुंडेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही

sena on munde27 सप्टेंबर : भाजप आणि शिवसेना युती तुटली असली तरी शिवसेनेनं मैत्रीचं नातं जपलंय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे परळीतून उमेदवार देणार नाही असं सेनेनं जाहीर स्पष्ट केलंय.

महायुतीचे शिल्पकार भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीची मोट बांधली. मात्र जागावाटपाच्या तिढ्यावरून अवघ्या काही महिन्यांची महायुती फुटली. युती तुटल्यानंतर भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालीये. मात्र शिवसेनेचे यादी अजून गुलदस्त्याच आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या निर्णयाप्रमाणे शिवसेनेनंही मुंडे कुटुंबियांसाठी निर्णय घेतला. बीडमधल्या लढतीत पंकजा मुंडेंविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार नाही असं जाहीर केलंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर परळीमध्ये मुंडे कुटुंबातल्या उमेदवाराविरोधात उमेदवार देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. लोकसभा पोडनिवडणुकीत शुक्रवारी डॉ.प्रितम मुंडे यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. आता शिवसेनेनंही या निर्णयाची रिघ ओढत आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात मेदवार देणार नाहीत. तसंच दुसरीकडे गीता गवळींनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 07:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close