S M L

व्हिएन्नातल्या शीख धर्मगुरूंच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये निदर्शनं

25 मे ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये काल रविवारी शिखांच्या दोन समुदायात संघर्ष झाला. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यापैकी नऊ जणांची अवस्था गंभीर आहे. एका समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत होते. त्याचवेळी पाच जण आत घुसले आणि गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही समुदायाचे लोक चाकू आणि बंदुका घेऊन एकमेकांना भिडले. त्यात शीख धर्मगुरूंचा मृत्यू झाला आहे. त्या धर्मगुरूंचं नाव रामानंद महाराज असं होतं. व्हिएन्नातल्या या घटनेचे पडसाद भारतात जालंधरमध्ये उमटले. निदर्शकांनी रस्त्यावर धाव घेत एटीएम आणि बसेसना आग लावली. या घटनेनंतर जालंधरमध्ये काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर पंजाबमध्ये लष्कराला हाय ऍलर्टचा इशारा देण्यात आला आहे. व्हिएन्नामधल्या गुरूद्वारा इथे घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद पंजाबमध्ये उमटले आहेत. पंजाबात नागरिकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर येउन उग्र निदर्शन केली. पंजाबात सगळ्याच ठिकाणी वातावरण पेटलय. होशियारपूर, भटिंडा, पतियाळा आणि दरभंगासारख्या अनेक शहरांत नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांनी हिंसाही घडवून आणली आहे. अनेक ठिकाणी रेल्वेडब्यांना आगी लावण्यात आल्या आहेत. जालंधरसह पंजाबमध्ये फगवाडा आणि होशियारपूर जिल्ह्यांत कर्फ्यू लावण्यात आला आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-जालंदर आणि अंबाला हायवेही जाम केले आहेत. संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागत आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंंत्री प्रकाशसिंग बादल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. तर परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी ऑस्ट्रियाकडे या घटनेचा तपशील मागितल्याचं समजत आहे. व्हिएन्नातल्या घटनेचे पडसाद आता राज्यतही उमटायला लागलेत. आज औरंगाबादमध्ये चर्मकार संघटनेतर्फे निर्दशनं करण्यात आली. रविदासपंथी धर्मगुरु रामानंद महाराज यांच्या व्हिएन्ना येथे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ औरंगाबादच्या क्रांती चौकात निदर्शन करण्यात आली. महाराष्ट्रीय चर्मकार संघ आणि अखिल भारतीय गुरु रविदासी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केली आहेत. ऑस्ट्रीयाच्या व्हिएन्ना शहरात प्रवचन करतांना धारदार शस्त्रांनं हल्ला करतेवेळी धर्मगुरु रामानंद महाराज यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात हल्लेखोरांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2009 08:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2009 08:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close