S M L

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी युतीपणाला लावली -राणे

Sachin Salve | Updated On: Sep 29, 2014 04:59 PM IST

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी युतीपणाला लावली -राणे

rane on udhav29 सप्टेंबर : भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्याचा मला अजिबात आनंद नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडे मुत्सद्देगिरी नाही. उद्धवला युती टिकवता आली नाही. ते स्कील त्याच्याकडे नाही. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी युतीपणाला लावली अशी टीका काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी केली. तसंच विधानसभा निवडणुकीवर लोकसभेच्या निकालांचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावाही नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. IBN लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर मत मांडलं. तसंच आपण अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असल्याचं स्पष्ट केलं.

नारायण राणे यांनी दिलेल्या मुलाखतीत भाजपवर सडकून टीका केली. गुजरातच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा कायम द्वेष केलाय. मुंबई वेगळी करण्याचं कारस्थान यांचच आहे. मोदी सरकारमधे बारा मंत्री भ्रष्ट आहेत. अमित शहांवर 302 चा आरोप आहे. गौडाच्या मुलाने बलात्कार केलाय. काँग्रेसपेक्षा गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारात भाजप एक नंबरचा पक्ष आहे. आणि हे मी या निवडणुकीत उघडं करणार आहे. त्यांना 75 हजार कोटीची गोदीची जमीन एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. आम्ही तो उघड करू असा इशाराही राणेंनी दिला. तसंच कोणत्याही पक्षाकडे 30 टक्के जनमतही नाही, आणि एकही पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नसल्याचं मत नारायण राणे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलंय. आता उमेदवारांची खरेदी झाली. निकालानंतर आमदारांची होईल असं नारायण राणे यावेळी म्हणाले. तसंच आघाडी तोडायची अवास्तव मागणी करायचं राष्ट्रवादीने आधीच ठरवलं होतं असा आरोपही राणेंनी केला. भाजपाकडे पन्नास टक्के उमेदवार देखील नव्हते आणि त्यांचं उसनं घेणं चालू असल्याची टीका राणेंनी केली. नितेश राणेंनी नक्की तिकीट मिळेल असा विश्वासही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केला.

कुणाकडे 30 टक्केही जनमत नाही

कोणत्याही पक्षाकडे 30 टक्के सुद्धा जनमत नाही. एकही पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळेच आता उमेदवारांची खरेदी झाली. निकालानंतर आमदारांची होईल. घोडेबाजार जोरात सुरू होईल. राष्ट्रवादीने आधीच ठरवलं होतं आघाडी तोडायची त्यांनी सुरुवातीपासून अवास्तव मागणी केली. मुख्यमंत्री पदाच्या अभिलाषेपोटी आघाडीही तुटली आणि युतीही. काही पक्षानी 302 चा आरोप असलेल्यांनाही उमेदवारी दिलीय. लोकांना नको असलेल्या उमेदवारांना तिकीटं मिळालीत. भाजपाकडे पन्नास टक्के उमेदवार देखील नव्हते. उसनं घेणं चालू आहे अशी टीकाही राणेंनी केली.

नितेशला उमेदवारी मिळणार याची मला पक्की खात्री होती आणि ते शेवटी तसंच झालं. मी भाजपात जाणार ही केवळ अफवा होती. मी स्वत:हून कोणालाही फोन केला नाही. मी काँग्रेसमध्ये समाधानी आहे. पदासाठी मी कोणाचाही लाचार नाही लाचारी माझ्या स्वभावात नाही असंही राणेंनी ठणकावून सांगितलं. माझी सटकली असं काही मी म्हणत नाही. जे आवडलं नाही ते बेधडक बोलून दाखवतो असं सांगत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2014 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close