S M L

आठवले गटात फूट, अर्जुन डांगळेंचा शिवसेनेला पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Sep 29, 2014 05:48 PM IST

आठवले गटात फूट, अर्जुन डांगळेंचा शिवसेनेला पाठिंबा

arujn dangle on sena29 सप्टेंबर : महायुती फुटल्यानंतर आता रिपाइं आठवले गटात फूट पडली आहे. रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेना पाठिंबा दिलाय. रामदास आठवले यांचा निर्णय चुकला असंही अर्जुन डांगळे यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं.

शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युती जागावाटपावरून तुटली. त्यानंतर महायुतीतील घटकपक्षांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपसोबत दोन दिवस चर्चेनंतर राज्यात चार मंत्रीपद, 3 विधान परिषद आमदारपदं, आणि महामडळांवर अध्यक्ष आणि सत्तेत आल्यावर 10 टक्के हिस्सा या समझौत्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एव्हाना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेत परत या, तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देतो असं जाहीर आवाहन करूनही आठवले आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता त्यांच्याच गटात फूट पडलीये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीबद्दल भूमिका मांडताना स्पष्ट केलं होतं की, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रिकरण झाल्याशिवाय भगवा आणि निळा फडकरणार नाही. त्यांच्या भूमिकेमुळे आम्ही गेली कित्येक वर्ष काम करत आलोय. तेच स्वप्न आज साकार करण्याची वेळ आलीये. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेवर आणण्यासाठी सक्रीय राहून शिवसेनेसोबत काम करणार आहे असं सांगत अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तसंच मी रामदास आठवले यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा असल्याचंही त्यांना सांगितलं होतं. आणि यासाठी आपण शिवसेनेसोबत गेलं पाहिजे असा सल्ला दिला होता मात्र तसं झालं नाही म्हणून मी शिवसेनेला पाठिंबा देत आहे. जर माझा निर्णय त्यांना मान्य नसले तर ते माझ्याबद्दल निर्णय घेऊ शकता असंही डांगळेंनी स्पष्ट केलं. परंतु आपण शिवसेनेत प्रवेश करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2014 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close